पुणे – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये महिलांच्या व मुलींच्या शिक्षणासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्यातीलच एक म्हणजे गणित अधिक सोपा व आनंददायी बनविण्याच्या उद्देशाने "अंकनाद- गणिताची सात्मीकरण प्रणाली" संस्थे तर्फे गणित यंत्र वितरण कार्यक्रम महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यास इंडिविश फाउंडेशनचे प्रमुख माननीय संजयजी पांडे, मॅप एपीक संस्थेचे डायरेक्टर मंदारजी नामजोशी, व निर्मितीताई नामजोशी, माननीय राजीवजी देवकर- अंकनाथ प्रणालीचे संशोधक. तसेच शशांक टिपणीस व ज्ञानेश कुटे हे- कंपनी सदस्य आणि, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता वाढ व विकास समितीचे प्रमुख माननीय कुमारजी दिवाकर सर तसेच आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदाताई देशमुख या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
गणित यंत्रवितरणामुळे विद्यार्थ्यांना अवघड संकल्पना सुलभपणे समजाव्यात, गणितात रस वाढावा आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकण्याची प्रेरणा मिळावी हा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. विद्यार्थ्यांना हे गणित यंत्र कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक दिले.
शिशुविहार प्राथमिक शाळा, प्रा.म. ना. अदवंत प्राथमिक शाळा,महिलाश्रम हायस्कूल, आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा या शाळांना प्रातिनिधिक स्वरूपात यंत्र वितरित करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा प्रयोगशील कार्यातून शिक्षण अधिक प्रभावी होईल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता वेदपाठक यांनी केले.