विज्ञान दिन

06 Nov 2025 17:37:27
आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत "राष्ट्रीय विज्ञान दिन" साजरा करण्यात आला. हा दिवस भारतात विज्ञानाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रातील योगदान करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी साजरा केला जातो. मा. मुख्याध्यापिका सौ. सुनंदाताई देशमुख यांच्या मार्गदर्शनातून आजच्या दिनाचे नियोजन करण्यात आले होते.
 
विद्यार्थिनींना विज्ञान दिनाची माहिती देण्यात आली. इ. १ ली ते ४ थी तील विद्यार्थ्यांनी वर्गात विविध प्रारंभिक प्रयोग सादर केले. व इ. ५ वी ते ७ वी तील विद्यार्थिनींसाठी विज्ञान विषयाशी निगडित भित्तिपत्रक बनविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली. Save water. Plant a tree, Reduce plastic, Use importance of hygiene, Healthy eating habits, cleanliness in school, Reduce, Reuse, Recycle......
विद्यार्थिनींनी यासारख्या विषयावर आधारित भित्तिपत्रके बनविली. त्यातून विद्यार्थिनींचे क्रमांक काढण्यात आले व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना विज्ञान प्रयोगाचे साहित्याची ओळख करून देण्यात आली.
 
Powered By Sangraha 9.0