नवागतांचे स्वागत

आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा    06-Nov-2025
Total Views |
दिनांक १६/०६/२०२५ रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेतील इ. १ ली ते ७ वी तील विद्यार्थिनींचे खास करून इ. १ ली तील विद्यार्थिनींचे अगदी दिमाखात स्वागत झाले. छोटे छोटे बालचमू अगदी अनोख्या नजरेने शाळेत उपस्थित होते.
मा. मुख्याध्यापिका सौ. सुनंदाताई देशमुख यांनी विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांना शाळेकडून शालेय पाठ्यपुस्तके व पाटी देण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त विद्यार्थिनींसाठी सेल्फी पॉईंट बनविण्यात आला होता तिथे विद्यार्थिनींचे फोटो, सेल्फी काढले.
प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व पालकांना शाळेविषयी व संस्थेविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. तसेच नवीन पालक यांच्यासाठी संस्थेतील आवार भेट याचे आयोजन करण्यात आले होते.