आज गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत परिपाठामध्ये हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. माननीय मुख्याध्यापिका सुनंदाताई देशमुख यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. वृषाली दुधनकर यांनी हुतात्मा दिन का साजरा केला जातो? व हुतात्मा दिना विषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींनी उभे राहून एक मिनिट मौन पाळून सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
हुतात्मा दिन स्मृती ज्योत तेवण्याचा हा दिन
भारतमातेच्या प्रेमापोटी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व ती ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली अशा हुतात्म्यांना शत् शत् नमन् ।