संविधान दिन

आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा    06-Nov-2025
Total Views |
आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत २६ नोव्हेंबर २०२४ “संविधान दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमास मा.मुख्याध्यापिका सौ. सुनंदाताई देशमुख उपस्थित होत्या. तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व सर्व १ ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थिनी देखील उपस्थित होत्या.
 
विद्यार्थिनींना मा. तिजारे सर यांनी संविधान म्हणजे काय?... हे सोप्या भाषेत सांगितले. व माननीय मुख्याध्यापिका सुनंदाताई देशमुख यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. संविधान दिनानिमित्त शाळेत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, तसेच सर्व विद्यार्थिनींनी भारतीय संविधान म्हटले. व संविधान दिनानिमित्त विश्वरूप फाउंडेशन आयोजित संविधानातील मूल्यांवर आधारित परीक्षेचे आयोजन करण्यात आले.