दि. १४/०७/२०२५, सोमवार रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत इ. ५ वी ते ७ वी तील विद्यार्थिनींची
“शालेय मंत्रिमंडळ निवडणूक” प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुनंदाताई देशमुख यांच्या मार्गदर्शनातून पार पडली.
लोकशाही पद्धतीने भारतात मतदान कश्याप्रकारे घेतले जाते त्याची प्रक्रिया काय असते हे थोडक्यात विद्यार्थिनींना कळावे हा या मागचा हेतू असतो. ज्या विद्यार्थिनी निवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या होत्या त्या विद्यार्थिनी दररोज प्रचारासाठी जात, त्या विद्यार्थ्यांना निवडून आणण्यासाठी आज मतदान घेतले.