लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी...
आज दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत "मराठी राजभाषा गौरव दिन" साजरा करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिन हा दिवस प्रख्यात लेखक कवी, कादंबरीकार कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. मा. मुख्याध्यापिका सौ. सुनंदाताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. स्मिताताई देशपांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदाताई देशमुख, सर्व शिक्षक व इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी मराठी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिनाविषयी माहिती देण्यात आली. व प्रमुख पाहुणे मा. स्मिताताई देशपांडे यांनी विद्यार्थिनींना "अहिल्याबाई होळकर" यांच्या जीवनावर आधारित कथा सांगितली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.