भोंडला

10 Nov 2025 11:25:02
आज शनिवार दि. १ ऑक्टोबर २०२२ रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत नवरात्रनिमित्त भोंडला हा सण साजरा करण्यात आला. हा सण विद्यार्थ्यांच्या अगदी आवडीचा सण आहे.
कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सविताताई रानडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व इयत्ता १ ली ते ७ वी तील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होते. मधोमध ठेवलेल्या हत्तीची पूजा करून त्या भोवती छोट्या मोठ्या अश्या सर्व विद्यार्थिनींनी फेर धरला. त्याचबरोबर भोंडल्याची गाणी म्हणत-म्हणत हा सण अतिशय उत्तम रित्या साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी दांडिया देखील खेळल्या. अशाप्रकारे अतिशय आनंदात उत्साहात सर्व विद्यार्थिनींच्या सहभागाने हा सण साजरा झाला. व शेवटी खिरापत वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Powered By Sangraha 9.0