दिनांक: २१ जून २०२६
आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेमध्ये २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. निरोगी जीवनशैलीसाठी योगासनांचे महत्त्व पटवून देणे आणि विद्यार्थिनींना त्याकडे प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७:३० वाजता शाळेच्या रमा पुरुषोत्तम ॲम्फी थिएटर येथे झाली.कार्यक्रमाची सुरुवात शांतता मंत्राने करण्यात आली.शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी विविध योगासने केली. यामध्ये ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन आणि सूर्यनमस्कार यांचा समावेश होता. प्राणायाम व ध्यान: शारीरिक व्यायामानंतर विद्यार्थिनींना अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम आणि काही मिनिटे शांत ध्यान केले, ज्यामुळे मानसिक शांतता अनुभवता आली.
मा.मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून योगाचे मानवी जीवनातील, विशेषतः विद्यार्थिनींच्या आरोग्यातील आणि एकाग्रतेतील महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले.