दिनांक: 15/08/2026
स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत आणि विविध उपक्रमांचे आयोजन.भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध देशभक्तीपर आणि उत्साहवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संगीत मय कवायत घेऊन करण्यात आली.शाळेच्या प्रांगणात इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी लयीत आणि उत्साहात 'संगीत मय कवायत' सादर केली. संगीताच्या तालावर केलेल्या या कवायतीमुळे संपूर्ण वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले.
कवायतीनंतर इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची एक भव्य रॅली काढण्यात आली. या ॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीने प्रेरित होऊन पुढील विविध घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला:"वंदे मातरम!","इंकलाब जिंदाबाद!", "देश की ताकत हम सब बच्चे!","सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा!", "भारत माता की जय!","स्वच्छ भारत, सुंदर भारत!" त्यानंतर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थिनींसाठी वर्ग सजावट आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलींनी अत्यंत कल्पकतेने वर्ग सजवले तसेच देशभक्तीपर व सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक रांगोळ्या काढल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका,सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि आनंदाने संपन्न झाला.