दिनांक: १२/०८/२०२६
आपल्या आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलींच्या उपस्थितीत 'दीप अमावस्या' अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमयी वातावरणात साजरी करण्यात आली. आपल्या पारंपरिक सणांचे संस्कार मुलींवर व्हावेत, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुलींनी व शिक्षिकांनी आणलेल्या विविध प्रकारच्या पणत्या आणि दिवे एकत्र मांडून त्यांची पूजा करण्यात आली.
दिव्यांची सुरेख आरास करून ते प्रज्वलित करण्यात आले.प्रज्वलित दिव्यांसमोर सर्व मुलींनी अतिशय एकाग्रतेने आणि सुस्वरात 'शुभं करोती कल्याणम्...' ही प्रार्थना व श्लोक म्हटले.शिक्षकांनी मुलींना दीपा अमावस्येचे सांस्कृतिक महत्त्व, दिव्यांचे जीवनातील स्थान आणि ही अमावस्या आषाढ महिन्याच्या शेवटी का साजरी केली जाते, याबद्दल सोप्या भाषेत माहिती सांगितली.मुख्याध्यापकांनी मुलींना मार्गदर्शन करताना सांगितले की, "दिव्याप्रमाणेच आपणही अभ्यासाच्या आणि चांगल्या गुणांच्या प्रकाशाने आपले जीवन आणि परिसर उजळवून टाकला पाहिजे."
पहिल्या ते सातवीच्या चिमुकल्या मुलींच्या मुखावरील उत्साहाने आणि दिव्यांच्या तेजाने संपूर्ण शाळा उजळून निघाली होती.