दिनांक: २२/०८/२०२६
वेळ: सकाळी ८.३० ते ९.००
स्थळ: आनंदीबाई कर्वे शाळा,कर्वेनगर (नटभैरव हॉल)
आयोजक: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या 'आनंदीबाई कर्वे शाळेमध्ये' नुकतेच सामूहिक 'विष्णुसहस्रनाम जप' कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांची रुजवण व्हावी या उद्देशाने या विशेष जपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठे सर शाळेमध्ये उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात महर्षी अण्णासाहेब कर्वे व आनंदीबाई (बाया) कर्वे यांच्या प्रतिमेला पूजन करून झाली.मराठे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विष्णुसहस्रनामाचे महत्त्व, त्याचे नियमित पठण केल्याने मिळणारी एकाग्रता आणि मानसिक शांतता याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी जपाचे स्पष्ट उच्चार कसे करावेत याचे प्रात्यक्षिकही दाखवले.
मराठे सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एका स्वरात आणि शिस्तबद्ध वातावरणात 'विष्णुसहस्रनाम जप' केला. संपूर्ण शाळा परिसर या पवित्र नामघोषाने आणि सकारात्मक ऊर्जेने दुमदुमून गेला होता.