शिवजयंती
दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती निमित्त आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजन करतेवेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. सविताताई रानडे, सर्व शिक्षक व इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रशालेमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र पर आधारित प्रसंग या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, तसेच निबंध स्पर्धेचे विषय देऊन निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्ट अशी शिवचरित्र पर आधारित प्रसंग रेखाटले होते. शिवजयंतीनिमित्त बालसभेचे देखील आयोजन करण्यात आले होते बालसभेत विद्यार्थिनींनी पाळणा, पोवाडा, राजमुद्रा व त्याचा अर्थ, शिवगर्जना, नृत्य या सर्वांचे सादरीकरण केले. सर्व विद्यार्थिनींनी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या समूहगीताचे सादरीकरण केले. तसेच १९ फेब्रुवारी रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या शोभायात्रेत प्रशालेतील सर्व ८ शिक्षक तसेच एकूण १०९ विद्यार्थिनी व सर्व सेवक वर्ग यांनी सहभाग घेतला. शोभायात्रेमध्ये विद्यार्थिनींनी पारंपारिक मराठी संस्कृती जोपासणारा पोशाख परिधान केला होता.